तुळजापूर : नगरपरिषद निवडणूक २०२५ अनुषंगाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : नगरपरिषद निवडणूक २०२५ अनुषंगाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न

 तुळजापूर : नगरपरिषद निवडणूक २०२५ अनुषंगाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न


धाराशिव  : तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर येथे भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. शहरातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली .

या बैठकीत ज्येष्ठ नेते माधवराव अण्णा कुतवळ, जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष ॲड धीरज भैय्या पाटील,जनसेवक अमोल भैया कुतवळ, तुळजापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष भारत भाऊ कदम, माजी नगरसेवक अमर भाऊ मगर, अशोक इंगळे, माजी नगरसेवक नितीन आबा पाटील, नागनाथ भाऊ भांजी, रसूल बागवान, श्रीकांत धुमाळ, रंजीत भैया इंगळे, आनंद मालक जगताप, सुदर्शन वाघमारे, बालाजी तट यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच तुळजापूर शहर काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये खालील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपञ देण्यात आले

🔹 अल्पसंख्याक शहराध्यक्ष – युसूफ नजीर शेख

🔹 ओबीसी सेल शहराध्यक्ष – श्रीकांत मोहनराव रसाळ

🔹 युवक शहर उपाध्यक्ष – ओंकार संतोष लोंढे

🔹 मागासवर्गीय युवक शहराध्यक्ष – प्रमोद काकासाहेब कांबळे

🔹 युवक शहर संघटक – गणेश विजयकुमार अमृतराव

🔹 अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष – अब्दुल वहाब नजमुद्दीन शेख

🔹 शहर संघटक – संजय हरिश्चंद्र सजन


तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस परिवार एकदिलाने सज्ज! 🇮🇳✋

जनतेचा विश्वास — काँग्रेसचा निर्धार!


Post a Comment

0 Comments