कळंब - नाम फाउंडेशन चा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदतीचा हात, पर्याय चा पुढाकार-
कळंब/ प्रतिनिधी भिकाजी जाधव- अतिवृष्टी, पूर आणि आत्महत्ये सारख्या संकटांनी उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील एकल महिला शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन कडून बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आला. नाम फाऊंडेशन यांनी हरभरा आणि ज्वारी चे उपलब्ध करून दिलेले हे बियाणे पर्याय संस्थेच्या माध्यमातून एकल महिला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
बियाण्यांचे वाटप करून पूरग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना विशेषतः एकल शेतकरी महिलांना नवजीवनाची उमेद दिली आहे. ही फक्त मदत नाही तर त्या प्रत्येक शेतकरी माऊलीसाठी दिलासा असल्याची भावना आहे हृदयस्पर्शी कार्यक्रमात व्यक्त झाली. एकल शेतकरी महिलेला एक नवा विश्वास मिळावा, म्हणून नाम फाऊंडेशन आणि पर्याय संस्थेने या बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि कळंब- धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर आणि नाम फाउंडेशन चे संचालक राजाभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी केले, यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नाम चे संचालक राजाभाऊ शेळके, ऋषिकेश तोडकर यांनी आपले विचार व्यक्त केले, एकूण सहा टेबल मांडून त्याच्या मागील हॉलमध्ये ठेवलेल्या बियाणाच अतिशय शिस्तबद्धरित्या वाटप कार्यकर्त्यांनी केलं .
याकरता कुपन पद्धत अवलंबली होती, नाम फाउंडेशन यांच्या मदतीचे तसेच पर्याय सामाजिक संस्थेच्या या बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाचे जे नियोजन करण्यात आलं त्याचं कौतुक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले ते आपल्या भाषणात म्हणाले की मदत आणणे आणि पैसे जमा करणे सोपं काम आहे मात्र ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम खूप कठीण असून ते पर्यायच्या माध्यमातून खूप छान प्रकारे होत आहे, अशा प्रकारचं काम करण्याची आज गरज आहे, यावेळी परंडा तालुक्यात आलेल्या पुरातून त्या कुटुंबाची कशी सुटका केली याचा थरारक अनुभव खासदार ओमराजे यांनी उपस्थित महिलांना सांगितला, या कार्यक्रमासाठी कळम तालुका कृषी अधिकारी सरडे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोतदार, पत्रकार संभाजी गिड्डे, सचिन काळे सागर बाराते, ऍड. मंदार मुळीक, प्रदीप यादव यांची उपस्थिती होती, कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांना अल्पोपहार देऊन तसेच बियाणाचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश पोतद्र यांनी मानले.
पर्याय संस्थेच्या प्रांगणात सहा काउंटर वरती कुपन पद्धत अवलंबून शिस्तबद्धपणे वाटप करण्यात आले वाटपासाठी पर्याय सामाजिक संस्थेच्या सुनंदा खराटे, अनिताताई तोडकर, परमेश्वर गवारे, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, विकास कुदळे, जानवी शिंदे, ज्योती शिंदे, वंदना चिलवंत, अश्विनी शिंदे, दर्शन जोगी, वैभव चोंदे, अशोक शिंदे, आश्रुबा गायकवाड, स्वाती कवडे, रियाज शेख, दिगंबर लडके, कल्पना जतकर, रफिक शेख, प्रकाश तोडकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






0 Comments