नातेवाईकांना भेटून घरी परतताना ज्येष्ठ दांपत्यावर काळाचा घाला; विद्यापीठाचा निवृत्त प्राध्यापक-वकील ठार छत्रपतीसंभाजी नगर शहरातील घटना-Chatrapatisambhajinagar Accident Incident Two Died

Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेवाईकांना भेटून घरी परतताना ज्येष्ठ दांपत्यावर काळाचा घाला; विद्यापीठाचा निवृत्त प्राध्यापक-वकील ठार छत्रपतीसंभाजी नगर शहरातील घटना-Chatrapatisambhajinagar Accident Incident Two Died

नातेवाईकांना भेटून घरी परतताना ज्येष्ठ दांपत्यावर काळाचा घाला; विद्यापीठाचा निवृत्त प्राध्यापक-वकील ठार छत्रपतीसंभाजी नगर शहरातील घटना-


छञपतीसंभाजीनगर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : कुटुंबाचे सांत्वन करून घरी परतताना रस्ता ओलांडत असताना भरधाव कारच्या धडकेत विद्यापीठातील रसायनशास्त्राची माजी प्राध्यापक डॉ. रामराव माने वय (71) व त्यांच्या पत्नी एडवोकेट रत्नमाला साळुंखे माने वय (64) या दोघांचा मृत्यू झाला शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर मधील पडेगावच्या आर्च अंगणासमोर हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक न थांबता पळून गेला ही दुर्घटना शनिवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पडेगाव रस्त्यावर हिट अँड रनची(Hit And Run)दुर्घटना घडली.

रामराव आत्माराम माने वय (71) आणि रत्नमाला रामराव माने वय (64) दोघे( राहणार नंदनवन कॉलनी हं.मु  देशमुख नगर मिटमिटा) असे ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे. रामराव माने हे 1980 ते 2024 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते त्यांनी अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही काम केले होते तर त्यांची पत्नी रत्नमाला या उच्च न्यायालयात वकिल करत होत्या. माने दांपत्य मूळचे रुईभर तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील होते त्यांचे एक नातेवाईक आर्चअंगण पडेगाव येथे राहतात त्यांच्या घरी निधनाची दुःखद घटना घडली होती. त्या नातेवाईकांच्या सांत्वनासाठी ते दोघेही पायी तेथे गेले होते दरम्यान त्यांना भेटून सायंकाळी साडेसहा वाजता ते मिटमिटा  येथील घराकडे निघाली होते,दरम्यान  पडेगाव मध्ये रस्ता ओलांडताना शहरातून दौलताबाद टी पॉइंट कडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट डिजाईर कारने दोघांनाही उडवले ही धडक इतकी भीषण होती की रामराव माने आणि रत्नमाला माने हे दोघेही जागीच ठार झाले; स्थानिकांनी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता माने दांपत्याची पार्थिव रविवारी धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी रुईभर येथे नेण्यात येणार असून तेथे तिथे सायंकाळी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

घाटी रुग्णालय मध्ये विद्यार्थी प्राध्यापकांची गर्दी

माने दांपत्याला मूलबाळ नव्हते मात्र त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पडली होती. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांना ओळखले जायचे त्यांचे अपघाती निधनाची वार्ता समजतात शहरातील घाटी रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी  मोठ्या संख्येने गर्दी केली होती 

अनेक विद्यार्थ्यांना पाल्यासारखे  जपले

एडवोकेट रत्नमाला साळुंखे  माने यांनी तीन दशकावर अधिक काळ हायकोर्टात यशस्वी वकिली केली प्रामाणिकपणा तळमळ आणि सामाजिक जाणीव यामुळे त्या एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जायच्या माने दांपत्याच्या अपत्य नव्हते परंतु त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पाल्यासारखे जपले.

मानसिक आर्थिक आधारासह विद्यार्थ्यांची हमीपत्र घेणारा गुरु

डॉ. माने यांनी अनेक विद्यार्थ्यांना अडी अडचणीच्या काळात मानसिक ,आर्थिक आधार दिला गुरु पण जपणारे प्राध्यापक म्हणून परिचित असलेल्या माने यांनी घडवलेल्या शेकडोहून विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधक म्हणून कार्यरत आहेत. खेड्यातील विद्यार्थ्यांना पैशाची अडचण भासतात माने सरळ हाताने मदत करायचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विदेशात संशोधनासाठी जाण्यासाठी माने सातत्याने आर्थिक मदत देखील करत होते अनेक राष्ट्रीय स्थानिक नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांनी रसायनशास्त्र शिक्षण विषयावर धोरणावर लिखाण केले

विद्यापीठात मोठ्या पदावर उल्लेखनीय काम

मूळ धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील रहिवासी असलेले डॉ. माने हे डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 1980 ते 2024 या काळात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते 2006 ते 2010 या काळात  सभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी विशेष कामगिरी बजावली विद्यापीठाच्या धाराशीव उपकेंद्राच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.

Post a Comment

0 Comments