एम.बी.बी.एस.ला प्रवेश निश्चित संस्कार जाधव याचा शिरगापूर येथे नागरी सत्कार.
---------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे शिरगापूर येथील युवक संस्कार सत्तेश्वर जाधव याचा सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हभप अशोकराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके,बालाघाट महाविद्यालयातील प्राध्यापक शिवचरित्रकार डॉ संतोष पवार, सरपंच डॉ कल्पना जाधव, पोलीस पाटील नागनाथ पाटील,माजी सरपंच सुळ,महाराष्ट्र पोलीस अक्षय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
संस्कार जाधव यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन पुढील वैद्यकीय शिक्षणाच्या पुर्व तयारीसाठी लातूर येथे जाऊन नीटची चांगली तयारी केली, जिद्द, चिकाटी, दररोजचा अभ्यास दररोज करुन नीटच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन पहिल्याच प्रयत्नात सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एससाठी प्रवेश मिळवला आहे त्यानिमित्त शिरगापूर ग्रामस्थांच्या वतीने संस्कार जाधव याचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी हभप अशोकराव जाधव, पत्रकार दयानंद काळुंके,डॉ संतोष पवार,अक्षय जाधव, नागनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य महादेव जाधव यांनी, प्रास्ताविक डॉ संतोष पवार यांनी तर आभार शामराव पाटील यांनी मानले .यासाठी भिकाजी जाधव, सत्तेश्वर जाधव,व्यंकट जाधव, डॉ बालाजी जाधव, चंद्रकांत भुसारे, प्रशांत भुसारे, सुशांत भुसारे, डॉ वरद जाधव,यांघ्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.

0 Comments