पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास-Dharashiv Seneior Citizenship Robbery Dammy Police

Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास-Dharashiv Seneior Citizenship Robbery Dammy Police

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने लंपास-

धाराशिव  : पोलीस असल्याचे भासवुन एका 62 वर्षीय  जेष्ठ नागरिकाची अत्यंत हात चलाखीने  फसवणूक केल्याचा आणि त्याच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी शहरातील गजबजलेल्या साठी चौकात दुपारी घडली शहरात तोतया पोलिसाकडून(Dammi Police)  अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीमुळे (Fraud)नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की धाराशिव शहरातील गणेश नगर भागातील प्रभुलिंग  प्रतयाप्पा  राजुरे वय (65) हे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास एसटी गॅरेज समोर साठे चौकात उभे होते; त्याचवेळी एका मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांच्याजवळ थांबवून "आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली तुम्ही काय करता, कुठे राहता, तुमची चौकशी करायची आहे; असे धमकावण्याच्या सुरात बोलून त्यांनी फिर्यादी राजुरे यांना गोंधळात पाडले; यादरम्यान त्या दोन आरोपी पैकी एकाने फिर्यादीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्यांना  विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.पुढील कारवाई म्हणून त्या आरोपीने तुमच्या हातातील अंगठी काढून द्या त्याबाबत चौकशी करायची आहे असे सांगून राजुरे यांच्याकडून त्यांची अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी(Goldring) काढून घेतली या गंभीर फसवणूक प्रकरणी फिर्यादी प्रभुलिंग राजुरे यांनी 16 ऑक्टोंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली त्यांच्या प्रथम खबरीवरून अज्ञात दोन आरोपी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास धाराशिव  पोलीस (Dharashiv police Station)करत आहेत.

दुचाकी वरून धूम ठोकली

अंगठी ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी अत्यंत हात चलाखीचा वापर केला त्यांनी फिर्यादी राजुरे यांच्या खिशाला हात लावला आणि तुमची अंगठी आम्ही आता खिशात ठेवली आहे असे खोटे सांगितले राजुरे यांचा विश्वास संपादन करून त्यांना काही करण्याआधीच आरोपी मोटरसायकल वरून निघून गेले थोड्यावेळाने जेव्हा फिर्यादी राजुरे यांनी आपल्या खिशात पाहिले तेव्हा अंगठी तिथे नव्हती आणि आपली फसवणूक झाल्याची त्यांच्या लक्षात आले.

Post a Comment

0 Comments