येवती पंचायत समिती मधून सौ.नंदा रामदास साखरे निवडणूक लढवणार.Dharashiv Zp Election And Panchyat Samiti

Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती पंचायत समिती मधून सौ.नंदा रामदास साखरे निवडणूक लढवणार.Dharashiv Zp Election And Panchyat Samiti

येवती पंचायत समिती मधून सौ.नंदा रामदास साखरे निवडणूक लढवणार.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आणि तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहापूर गटातील येवती पंचायत समिती गण हा पुन्हा सलग दुसऱ्यांदा एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या येवती पंचायत समिती गणातून मौजे हिप्परगा ताड येथील माजी ग्रामपंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.नंदा रामदास साखरे या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. कारण आज पर्यंत येवती पंचायत समिती गण हा काँग्रेसचच बालेकिल्ला असल्याचे दिसून येते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जर या येवती पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे ही सौ. नंदा रामदास साखरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments