दुर्दैवी घटना: सोलापूर -हैदराबाद महामार्गावर बस व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकी स्वार पती गंभीर जखमी तर पत्नी जागीच ठार-
सोलापूर : सोलापूर -हैदराबाद महामार्गावरील सोलापूर जवळील मार्केट यार्ड जवळ रविवारी दि,२६ रोजी दुपारी एसटी व दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी वर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हैदराबाद रोड मार्केट यार्ड या परिसरात रात्रंदिवस अवजड वाहनाची नेहमीच वर्दळ असते या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून सुद्धा अपघाताच्या प्रमाणात घट नाही हैदराबाद रोडवरील चंदन काटा येथे एसटी रविवारी दिनांक 26 रोजी दुपारी बस आणि दुसरीचा मोठा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार पती गंभीर जखमी झाला तर पत्नी ठार झाली आहे. शाहेनाज महेबूब शेख अशी मयत महिलेचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शाहेनाज मेहबूब शेख वय (34)राहणार कुंभारी ता. दक्षिण सोलापूर तर त्यांचे पती महबूब नबीलाल शेख वय (38) राहणार कुंभारी हे हे शेख दाम्पत्य तांदुळवाडी येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती लग्न उरकून गावी कुंभारी कडे जात असताना हैदराबाद रोडवरील चंदन काटा येथे मृत्यूने त्यांच्यावर काळाची झडप घातली हा अपघात एवढा भीषण होता की महिला ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती; तर पती गंभीर जखमी झाला अपघातानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर वाहनांची सुद्धा मोठी रांगा लागल्या होत्या ही घटना पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तर दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले तर पतीवर उपचार सुरू आहेत या घटनेची प्राथमिक माहिती सिविल पोलीस चौकी नोंद करण्यात आली आहे तर शहाजान शेख यांच्या पश्चात आई पती मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. सोलापूर जवळील मार्केट यार्ड हा परिसर नेहमीच वरदळीचा असतो त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत या प्रकरणी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे असे नागरिकांतून मागणी होत आहे.

0 Comments