मौजे धनगरवाडी येथील सरपंच नागनाथ घोडके अणदुर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे धनगरवाडी येथील तरुण कार्य कुशल सरपंच नागनाथ घोडके हे अणदूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.नुकतीच तुळजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे आरक्षण सोडत पार पडली. आणि धनगरवाडी येथील सरपंच नागनाथ घोडके यांनी सरपंच म्हणून गाव पातळीवर विविध समाज उपयोगी कार्य करून गाव परिसरात स्वच्छ प्रतिमा म्हणून सरपंच नागनाथ घोडके यांच्या कडे पाहिले जाते.गाव परिसरातील नागरिकांच्या आग्रहास्तव अणदूर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समितीच्या माध्यमातून गाव परिसरात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावावयाचे असून वाड्या वस्त्या पर्यंत विकास कामे करण्याचा मानस असल्याचे ही सांगितले. संबंधित पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच संधीचे सोने करीन अन्यथा अपक्ष म्हणून ही निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे ही सरपंच नागनाथ घोडके यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

0 Comments