अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना
-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : भूम तालुक्यातील आंबे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये गावातीलच एका तरुणाने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात आठ महिन्यापूर्वी लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नराधमाविरुद्ध अंबी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील आंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणांनी गावातीलच एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला; ही घटना सात आठ महिन्यापूर्वीची असून, आरोपीने पीडीतला खर्चाला पैसे देतो, असे सांगून घराबाहेर नेले त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर पिडीतेने मोठ्या हिमतीने दिनांक 7 रोजी आंबी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती सांगून, फिर्याद दाखल केली आहे. पिडीतिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351(2),351(3), तसेच बालकांचे अपराधापासून बालकाचे संरक्षण(Posco) कायद्यांतर्गत कलम 4, 8, 12 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments