धक्कादायक घटना : प्रेम संबंधाच्या वादातून अविवाहित महिलेचा प्रियकरांनी काढला काटा; -
नांदेड : किनवट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाटोदा खुर्द येथील घरी येणं जाणं करत असलेल्या एका पस्तीस वर्षीय युवकांनी गावातीलच 45 वर्षीय अविवाहित महिलेच्या तोंडावर उशी ठेवून गळा दाबून खून केल्याची धक्कादाय घटना दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुन करून आरोपी युवक पसार झाला आहे अवघ्या बारा दिवसात किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुसरी घटना आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाटोदा खुर्द येथील मंगल धुमाळे वय (45) गावातच आई आणि भाऊ यांच्या शेजारी वेगळी राहत होती.मंगलचे लग्न झाले नव्हते मात्र कृष्णा जाधव या युवकाशी मंगल यांचे संबंध होते .मंगल एकटी राहत असल्याने कृष्णा तिच्या घरी नियमित येत अशी कृष्णा दारू पीत असल्यामुळे त्यांच्या अधून मधून भांडणेही होत असे 25 ऑक्टोबर रोजी सकाळी मयत मंगल ची आई पाणी आणण्यासाठी तिच्या घरात गेली तेव्हा मंगल घरात निपचीत पडलेली आढळली. तिची जीभ बाहेर पडलेली होती आणि तोंडावर उशी असल्याने तिचा गळा दाबून खून झाला असा संशय आला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे ,ओमकार पुरी ,प्रदीप आत्राम ,सदाशिव अनंतवार, महिला पोलीस गोरे ,आणि त्यांच्या टीम घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी पंचनामा केला असून खून करणारा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके पाठवले आहेत. मयत मंगल च्या बहिणीने रात्री कृष्णाला घरातून जाताना पाहिले होते ज्यामुळे संशय अधिक बळावला दरवाजासमोर कृष्णाच्या चपला देखील होत्या तो बेपत्ता असल्याने कृष्णानेच मंगलचा गळा दाबून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments