चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर, सोलापुरातील घटना-Solapur Crime News Daily
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने भोसकुन खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी दि,१४ रोजी न्यू बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर नगर येथे घडली आहे. खुनाच्या घटनेनंतर(Murder Incident) आरोपी स्वतःहून हत्यारासह जोडबाजार पेठ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला दरम्यान या घटनेने रमाई आंबेडकर नगर हादरून गेली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयताची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर याने या घटनेची फिर्याद जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित आरोपी पती सुहास सिद्धगणेश हा आपल्या पत्नीसह यशोदा हिच्या समवेत कस्तुरबा मंडळीत कांदे ,बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पती सुहास हा वारंवार पत्नी यशोदाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत असत या भांडणाला कंटाळून पत्नीने पाच महिन्यापूर्वी पतीपासून फारकत घेत मुलीला घेऊन मावशी अन्नपूर्णा निळकंठ बाळशंकर यांच्या घरापाठीमागील बाजूला वेगळी राहत होती ; तर पती हा मोठा मुलगा व सून यांच्यासह तळे हिप्परगा राहण्यास गेला होता. मयत यशोदा यांची मावशी अन्नपूर्णा या सुद्धा मोठ्या मुलासमवेत सिद्धेश्वर मार्केट यार्डात (Market Yard Solapur)कांदा विक्रीचा व्यवसाय करतात.मंगळवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मार्केट यार्ड जाण्यासाठी निघाले असताना यशोदा यांच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराजवळ जाऊन घरात डोकावुन पाहिले असता यशोदा ही लोखंडी बेड जवळ जमिनीवर खाली पडलेली होती. व संशयित आरोपी सुहास हा त्याच्या हातातील चाकूने यशोदा हिच्या पोटात व गळ्यावर वार करत होता तेव्हा त्यांनी आरडाओरड करत यशोदा जवळ जात असताना संशयित आरोपी सुहास याने आमच्या मध्ये कोणी आले तर सर्वांना खल्लास करून टाकेन अशी धमकी देऊन चाकूसह घरातून निघून गेला.
त्यानंतर घराशेजारी राहणाऱ्या करिष्मा गजदाने तिथे आल्या त्यांनी शालिनी कटारमल हिला सुहास यांनी यशोदा हिला चाकूने मारले आहे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रिक्षा घेऊन ये असे फोन करून सांगितले. त्यावेळी तुषार कटारमल ,शालिनी कटारमल व रिक्षाचालक गोटू बनसोडे यांनी यशोदा हिला रिक्षात घालून तात्काळ सिविल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital Solapur) उपचारासाठी दाखल केली परंतु उपचार पूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . या प्रकरणी पती सुहास तुकाराम सिद्धगणेश यांच्या विरोधात अन्नपूर्णा बाळशंकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात(Jodbhavi Peth Solapur Police Station) फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज मुलानी हे करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले.मयत यशोदा हिचे माहेर रमाबाई आंबेडकर नगर येथे होते त्यामुळे ही घटना घडल्यानंतर शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी महिला नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता.

0 Comments