तुळजापूर पंचायत समितीच्या ८ गणावर महिलाराज सभापती पद खुल्या गटाला असल्याने चुरस वाढणार

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर पंचायत समितीच्या ८ गणावर महिलाराज सभापती पद खुल्या गटाला असल्याने चुरस वाढणार

तुळजापूर पंचायत समितीच्या ८ गणावर महिलाराज सभापती पद खुल्या गटाला असल्याने चुरस वाढणार !.


धाराशिव /राजगुरु साखरे : तुळजापूर पंचायत समितीच्या 18 गणाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक 13 रोजी पार पडला यामध्ये 18 पैकी 8 गण महिलांसाठी आरक्षित झाली आहेत तर सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गात सुटलेली असल्याने सुरेश वाढली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे सभापती आगामी निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे त्यामुळे यावेळी पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगलीच सुरज निर्माण होणार आहे या आरक्षण सोडत कार्यक्रमास विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षित महिला गणामध्ये आपसिंगा,सिंदफळ, मंगरूळ,  ,काटगाव , होर्टी ,शहापूर ,नांदगाव,येवती या गणांचा समावेश आहे.तर तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ , काटी,  अणदुर,  काटगाव , जळकोट , नंदगाव , या गणामध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती पदी बसण्यासाठी आता सर्वच पक्षातील प्रमुख नेते माजी सभापती आणि नवोदित कार्यकर्त्यांची मांदीयाळी  सुरू झाली आहे. राजकीय पातळीवर हे पद प्रतिष्ठेचे मानले जाते तुळजापूर पंचायत समितीने अनेक दिग्गज नेत्यांना या पदाने उभारी दिली आहे या पदापासून अनेक दिग्गजांनी  राजकारणात मोठी  गरुड भरारी घेतली आहे. त्यामुळे यावेळीही अनेक इच्छुक आपलं नशीब आजमण्यासाठी सज्ज झाले आहेत त्या अनुषंगाने राजकीय पटावर जोरदार हालचाली सुरू झाले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षापासून झाल्या नसल्यामुळे इच्छुकामध्ये मोठी नाराजी पसरली होती आता एकदाचा मुहूर्त लागला असून घोषणा होताच अनेक इच्छुकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावोगावी भेटीगाठी घेणे, शेतकऱ्याच्या प्रश्न प्रशासन दरबारी  मांडणे,असे फंडे वापरत आहेत तर आपल्या नावापुढे भावी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य लावून सदैव चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट वायरल करण्याचा धडाका सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.

तिकीट मिळवण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची धडपड

अनेक जण पक्षश्रेष्ठीकडे आपल्यालाच तिकीट मिळण्यासाठी अनेक दिवसापासून फिल्डिंग लावली आहे स्थानिक गटबाजी, विरोध या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठीकडून तिकीट दिले जाईल असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत असून  काहीजण बंड करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे देखील संकेत मिळत आहेत.


असे असणार जिल्हा परिषद व पंचायत समिती तुळजापूर आरक्षण 2025

1) सिंदफळ  जिल्हा परिषद गट - एस सी महिला 

A) सिंदफळ पंचायत समिती गण - ओबीसी महिला

B) अपसीगा पंचायत समिती गण - एस सी महिला

2) काक्रंबा जिल्हा परिषद गट- एस सी पुरुष

A) काक्रंबा पंचायत समिती गण - एस सी पुरुष 

B) सलगरा दि पंचायत समिती गण - ओबीसी पुरुष 

3) मंगरुळ जिल्हा परिषद गट - जनरल महिला 

 A) मंगरूळ पंचायत समिती गण - जनरल महिला 

 B) आरळी बु. पंचायत समिती गण - ओबीसी पुरुष 

4) काटी जिल्हा परिषद गट - ओबीसी महिला 

A) काटी पंचायत समिती गण - जनरल पुरुष 

 B) सावरगाव पंचायत समिती गण - जनरल पुरुष 

 5) अणदूर जिल्हा परिषद गट - जनरल पुरुष 

 A) अणदूर पंचायत समिती गण -जनरल पुरुष 

B) चिवरी पंचायत समिती गण-जनरल पुरुष 

 6) काटगाव जिल्हा परिषद गट - ओबीसी पुरुष 

 A) काटगाव पंचायत समिती गण - जनरल महिला 

 B) तामलवाडी पंचायत समिती गण - जनरल महिला 

 7) जळकोट जिल्हा परिषद गट - जनरल महिला

 A) जळकोट पंचायत समिती गण - जनरल पुरुष 

 B) व्होर्टी पंचायत समिती गण - जनरल महिला 

 8) शहापूर जिल्हा परिषद गट - एस सी पुरुष 

 A) शहापूर पंचायत समिती गण - ओबीसी महिला

 B) येवती पंचायत समिती गण - एससी महिला 

 9) नंदगाव जिल्हा परिषद गट - जनरल पुरुष 

 A) नंदगाव पंचायत समिती गण - जनरल महिला 

 B) खुदावाडी पंचायत समिती गण - जनरल पुरुष

Post a Comment

0 Comments