चिवरी पंचायत समिती गणातून माजी सैनिक तथा सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक-
चिवरी / प्रतिनिधी बिभिषन मिटकरी :- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आणि तुळजापूर तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अंदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे यामुळे या गणात अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे . या चिवरी पंचायत समिती गणातून चिवरी येथील माजी सैनिक तथा सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्ष संभाजी काळजाते हे महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
माजी सैनिक संभाजी काळजाते बालाघाट न्यूज टाइम्स प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, मी सैन्य दलामध्ये १७ वर्ष देश सेवेसाठी घालवले आहेत उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये येऊन प्रामाणिकपणे काम करून शेतकरी, शेतमजूर, नवोदित युवकांना सैन्य भरती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन करणे, तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहन करणे, माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी सदैव तत्परतेन काम करणार, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, मी राजकारणामध्ये पैसा कमवण्यासाठी येणार नसून जनतेचे प्रामाणिकपणे प्रश्न सोडवणार , महायुतीकडून पक्षाने निवडणूक लढवण्यास संधी दिल्यास संधीचे सोनं करणार असे प्रतिनिधी बोलताना श्री काळजाते यांनी सांगितले.
इच्छुक उमेदवारांनी आपला गण, संपूर्ण नाव ,मोबाईल नंबर खालील मो.क्रमांकावर पाठवा आपल्या बालाघाट न्यूज टाइम्स या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल.
मो.9881298946
मो.+91 90758 34766

0 Comments