तुळजपार येथे 308 मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पंढरपूरकर गल्लीतील नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत तिव्र नाराजी-Tuljapur Local News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजपार येथे 308 मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पंढरपूरकर गल्लीतील नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत तिव्र नाराजी-Tuljapur Local News Daily

तुळजपार येथे 308 मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पंढरपूरकर गल्लीतील नागरिकांकडून मूलभूत सुविधांबाबत तिव्र नाराजी-


तुळजापूर प्रतिनिधी :श्री क्षेत्र तुळजापूर येथील पंढरपूरकर गल्लीत एकूण 308 मतदारांनी सुरू असलेल्या समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदानावर बहिष्कार जाहीर केला आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन देण्यात आली आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की —परिसरात आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत,24 तास सुरू असलेल्या अनधिकृत दुचाकी पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे,याबाबतचे निवेदन नागरिकांनी तहसीलदार, निवडणूक अधिकारी, मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात सादर केले आहे.

आज, मंगळवार दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी, नगरपालिका निवडणूक 2025 च्या स्वीप उपक्रमांतर्गत शिक्षक प्रत्यक्ष पाहणीसाठी परिसरात आले असता ज्येष्ठ नागरिक श्रीमती निर्मला कावरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

त्यांनी सांगितले की,आमच्या निवेदनावर 1 डिसेंबर 2025 पर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास आणि लेखी उत्तर न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यांची प्रशासनाने नोंद घ्यावी,स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की हा इशारा त्यांची गंभीर नाराजी दर्शवणारा आहे आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभाग व प्रशासन याकडे गंभीरतेने पाहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






Post a Comment

0 Comments