खळबळ जनक घटना : धाराशिव तालुक्यातील रूई ढोकी येथील रेल्वे फाटकाजवळ तरुणीचा जाळून निर्घृण खून, -
धाराशिव :धाराशिव तालुक्यातील रुई (ढोकी) शिवारात असलेल्या रेल्वे फाटकाजवळ एका अज्ञात तरुणीचा जाळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दि,२७ रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इतका भयानक जाळला आहे की, मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मृत तरुणीची ओळख पटवणे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. धाराशीव जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून खुनाचा गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे, मागील आठवड्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह जळून टाकण्याची घटना घडली होती तसेच जळकोट ,केशेगाव येथील खून प्रकरण ताजे असतानाच आता धाराशिव तालुक्यातील रूई (ढोकी) शिवारातील रेल्वे फाटकाजवळ अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सुजान नागरिकांतून बोलले जात आहे.
या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आज दि,२७ रोजी सकाळी काही नागरिक रेल्वे फाटकाजवळून जात असताना त्यांना एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनास्थळाचे दृश्य अत्यंत विदारक होते. मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने तिच्या वयाचा, कपड्यांचा किंवा शरीरावरील ओळखीच्या खुणांचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. नागरिकांनी तात्काळ ढोकी पोलिसांना याची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांना पाचरण करण्यात आले आहे. या अज्ञात तरुणीला जाळण्यापूर्वी तरुणीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमका मृत्यू कसा झाला, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे. मात्र मृतदेहाचा कोळसाच झाला असल्याने पोलिसासमोर ओळख पटवणे मोठे आव्हान आहे.

0 Comments