लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,पिडीता गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकस ;बार्शी तालुक्यातील घटना-
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : बार्शी तालुक्यातील पांगरी गावात अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणांनी लग्नाचे आमीष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित 17 वर्षाची असून ती सध्या 18 आठवड्याची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणी स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात पृथ्वीराज उर्फ संजय चांदणे (रा. पांगरी ता. बार्शी) याचे विरोधात लैंगिक अत्याचार फसवणूक तहसील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत (Posco Act)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी पीडित मुलगी ही आपल्या आई वडिलांसोबत पांगरी येथे वास्तव्यास असून तिचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाची उपजीवीका चालवतात. संशयित आरोपी पृथ्वीराज उर्फ संजय चांदणे हा त्याचा शेजारी असून गेल्या दोन वर्षापासून त्याची पिडीतेशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्या घरात ये-जा सुरू केली. सुमारे चार महिन्यापूर्वी मुलगी घरी एकटी असताना त्यांनी लग्नाचे आमीष दाखवुन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी वारंवार असे कृत्य केले. अल्पवयीन असल्याची माहित असूनही आरोपीने तिला फसवुन गैरवापर केला असे फिर्यादीत सांगितले आहे. "आपण लग्न करू हे कुणालाही सांगू नकोस असा दम आरोपीने तिला दिला होता दरम्यान पिडीतेला पोटदुखीचा त्रास झाल्याने पीडित मुलगी व तिची आई उपचारासाठी श्रद्धा हॉस्पिटल बार्शी येथे गेले तेथे तपासून दरम्यान डॉक्टरांनी पीडित मुलगी 18 आठवड्याची गर्भवती असल्याची सांगीतली. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली हॉस्पिटलमध्ये पोलीस पोहचले असता त्यांनी प्राथमिक चौकशी करून पीडित व तिच्या आईचा जबाब घेतला त्यानंतर त्यांनी पांगरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत( Posco Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments