कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवार्ड; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुरा;अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा युरोपात डंका-
सोलापुर(प्रतिनिधी) - तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ इमानदार, आमदार व मंत्री दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर चे भूमिपुत्र असलेले लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला ईस्टर्न युरोप अवॉर्ड मिळाले असून या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला. अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणीसह दिग्दर्शनाचा डंका युरोपात ही वाजल्याने सोलापूर जिल्ह्यातून आणि पूर्ण देशातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कल्पक बुद्धिमत्तेच्या आणि अथक मेहनतीच्या बळावर वास्तवात घडलेल्या मात्र स्वप्नवत वाटणाऱ्या कथा आपल्या दमदार लेखणीतून कागदावर उतरवून स्वर्गीय कॅबिनेट मंत्री ,आमदार भाई गणपतराव देशमुख यांची कथा आणि राजकारणाची, समाजाची व्यथा जगाच्या वेशीवर मांडणाऱ्या आणि देश-विदेशातील पन्नास पेक्षा जास्त पुरस्कार मिळविणाऱ्या 'कर्मयोगी आबासाहेब' या हिंदी/मराठी सिनेमाने पुन्हा एकदा युरोपात पुरस्कार मिळविले आहे. नुकतेच युरोपातील रोमानिया येथे झालेल्या जागतिक स्तरावरील ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. या चित्रपटासाठी अल्ताफ शेख यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड देण्यात आला. या फिल्म फेस्टिव्हल मध्ये जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांचे नामांकन करण्यात आले होते. या देश-विदेशातील सर्व सिनेमांच्या स्पर्धेत 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाने इस्टर्न युरोप अवॉर्ड मिळविल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामुळे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



0 Comments