अत्याचार प्रकरणातील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : कामाच्या शोधात मैत्रिणी सोबत पाटोदा येथे गेलेल्या तरुणीवर तिथून परत असताना दुचाकी स्वारांनी मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 15 फेब्रुवारी 2022 रोजी घडली होती. या प्रकरणी दाखल तुळजापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची न्यायालयासमोर सुनावणी होऊन यामध्ये आरोपी सुरज बाबूराव लातुरे पठाण यास न्यायालयाने अत्याचार प्रकरणात दि,१२ नोव्हेंबर 2025 रोजी दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 17 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. हा न्याय निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश -3 आवटे यांनी दिला.
या बाबत जिल्हा सरकारी वकील यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी तिच्या एका मैत्रिणी सोबत कामाच्या शोधात तुळजापूर येथून पाटोदा येथे गेली होती परंतु तिथे दोघांनीही काम शोधण्याच्या प्रयत्नात रात्री उशीर झाला होता यामुळे फिर्यादी व तिच्या मैत्रिणीस सोडण्यासाठी मैत्रिणीच्या ओळखीचा मुदतशीर शेख व सुरज पठाण हे दोघे दुचाकीवरून निघाले यावेळी पीडिता सुरज पठाण हे दोघेदुसे करून निघाले .यावेळी पिढीचा ही सुरज पठाण यांच्या दुचाकी वर बसलेली होती हे चौघे तुळजापूरकडे निघाले असताना सुरज यांनी दुचाकीची गती कमी केली. त्यामुळे मैत्रिण पुढे निघून गेली त्यानंतर आरोपी सुरज पठाण यांनी पिडितेला शरीर सुखाची मागणी केली यास तिने नकार दिल्यानंतर आरोपीने वडगाव पाटील जवळील खडी केंद्राकडे दुचाकी नेत पीडितेस मारहाण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला; तसेच याबाबत कोणास सांगितले असते तिच्यासह मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर सातत्याने धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी सुरजी लातूर हे पठाण याच्या वर कलम 376 (2)(एन) 384,504, 506 भारतीय दंड विधान संहिता अंतर्गत गुन्हा नोंद होऊन पोलीस उपनिरीक्षक एस जी बनसोडे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.
या प्रकरणाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश आवटे यांच्यासमोर सुनावणी झाली यामध्ये समोर आलेले पुरावे पाच साक्ष व शासकीय अभियोग्य एडवोकेट महेंद्र देशमुख यांनी सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 17 हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे.

0 Comments