प्रेम प्रकरणाच्या कारणावरून येडशी घाटात अडवून एकास बेदम मारहाण ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Gramin Police Station Crime News Yedshi Ghat

Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रेम प्रकरणाच्या कारणावरून येडशी घाटात अडवून एकास बेदम मारहाण ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv Gramin Police Station Crime News Yedshi Ghat

प्रेम प्रकरणाच्या कारणावरून येडशी घाटात अडवून एकास  बेदम मारहाण ५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव : प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एकास शिवीगाळ करुन  लाथाबुक्यांनी एकास  बेदम मारहाण केल्याची घटना थरारक घटना धाराशिव  तालुक्यातील येडशी येथील घाटात घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेले अधिक माहिती अशी की   आरोपी नामे- धिरज गायकवाड, परशुराम गायकवाड, हणमंत ईटकर, सुरज ईटकर, गणेश गायकवाड, )सर्व रा. बारा नं पाटी, शाम नगर ता. जि. लातुर) यांनी दि.18.11.2025 रोजी 01.00 वा. सु. येडशी घाटात येडशी येथे फिर्यादी नामे-विशाल दिपक गायकवाड, वय 25 वर्षे, रा. बारा नं पाटी शाम नगर ता. जि. लातुर यांना नमुद आरोपींनी प्रेम प्रकरणाचे  कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकुड व बेल्टने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल गायकवाड यांनी दि.28.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 351(3), 189 (2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments