अल्पवयीन मुलीशी विवाह दोन्ही कुटुंबावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; असे फुटले अल्पवयीन असल्याचे बिंग लातुर जिल्हातील घटना-
लातूर : अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही विवाह लावून संसार थाटणाऱ्या दोन अल्पवयीन पीडितांच्या फिर्यादीवरून दोघा पतीसह त्यांच्या कुटुंबीयाविरुद्ध थेट पोस्कोचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या हिमायतनगर येथील आरोपी सद्दाम शेख यांचे त्यांच्या सह पीडीतेच्या कुटुंबीयांनी 19 एप्रिल 2024 मध्ये अल्पवयीन मुली सोबत लग्न लावून दिले होते त्यांना एक मुलही जन्मले आहे ते सध्या 6 महिन्याचे आहे मुलगी अल्पवयीन असल्याची माहित असतानाही तिचा विवाह जुळविला व पती आरोपी सुद्धा मी यांनी तिच्यासोबत विवाह केला यामुळे पिडीतिच्या पतीसह वडील वाजिद शेख आजी लालबी शेख (सर्व राहणार हिमायतनगर लातूर )सासू शेख हसीना ,सासरे अमजीद शेख दोघे (राहणार तेली गल्ली -लातूर) यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 798 / 25 कलम 64 (2),एच, 64 (2) (m) भारतीय न्याय संहिता सह कलम 5 6 पोस्को कायद्यानुसार कलम 9 ,10 ,11 बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष आंधळे हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दिनांक 30 जून 2024 मध्ये लावण्यात आला होता. ती पिडीता सध्या गरोदर आहे अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावला आरोपीवर पीडीता यांच्यात आजपर्यंत शारीरिक संबंध ठेवले आली आहेत यातून पीडित सहा महिन्याचे गरोदर आहे . लग्न लावून दिल्याने पती इमरान इस्माईल शेख ,सासरे इस्माईल शेख दोघे (राहणार आझाद नगर परळी जिल्हा बीड )पीडी तिचे वडीत रफिक इसाक शेख, आई शबाना रफिक शेख दोघे राहणारे इस्लामपुरा लातूर यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 769 / 25 कलम 64 2 एच,64 (2) (m) भारतीय न्याय संहिता कलम 5, 6 पोस्को कायदा व कलम 9 10 11 बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडीवाडे तपास करीत आहेत.
असे फुटले अल्पवयीन असल्याचे बिंग
अल्पविन असतानाही घरच्यांनी विवाह लावून दिले त्या मुलींना सासरच्या मंडळींनी ही पसंती केली दोन्ही पिडीतांचे संसार सुरू होते परंतु शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांचे वय उघड झाले त्यातील एक पिढीत 18 वर्षे दोन महिन्याची तर दुसर दुसरी 17 वर्षे 5 महिन्याची असल्याचे निष्पन्न झाले यामुळे शासकीय रुग्णालयातील तक्रारीवरून पीडित तिला फिर्यादी करून तिच्या आई-वडिलांसह पती व सासू-सासरेविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments