माळशिरस तालुक्यातील दसूर येथे यल्लमादेवी यात्रा महोत्सव सोमवारपासुन प्रारंभ -Malshiral dasur Villege Yallmadevi Yatra Mahostav

Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील दसूर येथे यल्लमादेवी यात्रा महोत्सव सोमवारपासुन प्रारंभ -Malshiral dasur Villege Yallmadevi Yatra Mahostav

माळशिरस तालुक्यातील दसूर येथे यल्लमादेवी यात्रा महोत्सव सोमवारपासून प्रारंभ -


दसुर प्रतिनिधी  /संजय निंबाळकर : दसूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील ग्रामदैवत यल्लमादेवी यात्रा महोत्सव २०२५ सोमवार, १ डिसेंबरपासून बुधवार, ३ डिसेंबरपर्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व पुजारी मंडळाने केले आहे.

धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक

सोमवार – १ डिसेंबर २०२५

सायंकाळी ५.०० वा. गावातून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान व ओटी वाहिनी पूजन.

मंगळवार – २ डिसेंबर २०२५

सकाळी ९.०० वा. महापूजा व नैवेद्य.

सायंकाळी ६.०० वा. पालखीबरोबर कोल्हापूर ऑर्केस्ट्राचे सादरीकरण.

मुख्य दिवस – बुधवार – ३ डिसेंबर २०२५

पालखी मिरवणूक, माहेरघर घेणे व दुपारी ४.०० वा. अभिषेक.

 यात्रेचे सर्व आयोजन संपूर्ण ग्रामस्थ, दसूर व पुजारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments