अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीस बारा वर्षाची शिक्षा जिल्हा सत्र व न्यायालय कोल्हापूर यांचा निकाल-Kolhapur District And Session Court Sexully Assult Posco Judgement

Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीस बारा वर्षाची शिक्षा जिल्हा सत्र व न्यायालय कोल्हापूर यांचा निकाल-Kolhapur District And Session Court Sexully Assult Posco Judgement

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीस बारा वर्षाची शिक्षा जिल्हा सत्र व न्यायालय कोल्हापूर यांचा निकाल-


कोल्हापुर-प्रतिनिधी/रूपेश डोलारे : तेरा वर्षाच्या मुलीस धमकावून तिच्यावर  लैंगिक अत्याचार केला यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी आरोपी अतुल संपतराव जाधव पाटील तालुका हातकलंगले या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश(Session Court)  क्रमांक 1 आर.व्ही  आदोने  यांनी बारा वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली या खटल्यात सरकारी वकील एडवोकेट अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.

या खटल्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की पीडित मुलीच्या आईचे निधन झाल्यामुळे ती आपल्या आजी आजोबाकडे आली होती दिनांक 7 ऑगस्ट 2015 व त्यापूर्वी सात महिने अगोदर आरोपी अतुल पाटील यांनी पिडीतेच्या घरात जाऊन कोणी नसताना तिला धमकावून अत्याचार केला याबाबत कोणालाही न सांगण्याची भीती दाखवली होती. मुलगी सात महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला पिडीतेच्या  आजोबांनी याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण(Posco Act) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून तपास केला या प्रकरणी अतुल पाटील याला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केली होते. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही आदोने यांच्या न्यायालयात सुरु होते. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी त्याला साक्षीदार तपासले(Witness) समोर आलेले पुरावे तसेच सरकारी वकील एडवोकेट पाटोळे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश आदोने यांनी आरोपी अतुल पाटील याला भारतीय दंड विधान सहिता कलम(Ipc Section)  452 376 506 पोस्को कलम 6 नुसार 12 वर्षे सक्त मजुरी शिक्षा सुनावली तपास अधिकारी परशुराम कांबळे कोर्ट पैरवी अधिकारी विशाल पाटील ,मिलिंद टिळे यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.

Post a Comment

0 Comments