धक्कादायक घटना : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये सहा पुरुष सावकारासह एका महिला सावकाराची नावे बार्शी तालुक्यातील घटना-Barshi Crime News Solapur

Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक घटना : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये सहा पुरुष सावकारासह एका महिला सावकाराची नावे बार्शी तालुक्यातील घटना-Barshi Crime News Solapur

धक्कादायक घटना : बार्शीमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये सहा पुरुष सावकारासह एका महिला सावकाराची नावे 


सोलापूर/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : बार्शी नगरपालिकेतील सफाई कर्मचारी गणेश गोविंद बनसोडे वय (45) राहणार म्हाडा कॉलनी गाडेगाव रोड बार्शी यांनी व्याजाने पैसे देणाऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या(Suicide)  केल्याची धक्कादाय घटना घडली याप्रकरणी मयताची पत्नी वैशाली गणेश बनसोडे वय 35 यांनी  सात जणाविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात(Barshi Police Station)  फिर्याद दाखल केली आहे.

मयताची पत्नी वैशाली बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश खुडे राहणार (सुभाष नगर लहुजी चौक ),प्रशांत माने राहणार (बालाजी कॉलनी) विशाल गुगळे (सोनार रा. बार्शी→) अतुल कांबळे (रा. मंगळवार पेठ झोपडपट्टी )संगीता पवार रा. (बार्शी) सचिन सोनवणे रा. भीम नगर व संतोष नानासाहेब कळमकर राहणार बार्शी या सात जणांनी व्याजाच्या पैशाच्या कारणावरून गणेश यांना सातत्याने त्रास दिला होता फिर्यादी वैशाली बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचे पती गणेश दहा वर्षांपूर्वी बार्शी नगरपालिकेत (Nagarpalika)सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते दिवाळीनिमित्त त्या आपल्या दोन मुलासह सोलापूरला माहेरी गेले असताना 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या नंदेचा फोन आला तिने गणेश यांनी ग्रामीण रुग्णालया (Gramin Hospital) समोरच्या कॅन्टीनमध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली.

तक्रारीनुसार गणेश बनसोडे यांनी वर्षभरात सात जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते मागील काही महिन्यात घरात येऊन त्यांना  सतत पैशाचा तगादा लावून घर आणि कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ ,धमक्या देत, मानसिक त्रास दिला होता प्रशांत माने संगीता पवार आणि संतोष कळमकर हे वारंवार त्यांच्या घरी येऊन धमक्यात येत असत संगीता पवार हिने तर पैसे दिले नाहीत तर महिलांना घेऊन छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली होती.अशीही तिने फिर्यादीत नमूद केली आहे या सर्व मानसिक तणामुळे गणेश बनसोडे यांनी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले घटनास्थळी पोलिसांना चार सुसाईड (Suicide notes)नोट्स मिळाले असून त्यामध्ये वरील सातही जणांची नावे नमूद आहेत त्या सर्वांकडून झालेल्या सावकारीचा त्रासामुळेच आत्महत्या (Suicide)केल्याचे स्पष्टपणे लिहिलेली आहे याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत या घटनेमुळे बार्शी शहर परिसरात व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments