महाशस्त्ररंग मार्शल आर्ट असोसिएशन धाराशिवचे अध्यक्ष सुनील नागणे व सचिव संतोष कदम यांना लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवड -
धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे : महाशस्त्ररंग मार्शल आर्ट असोसिएशन धाराशिव जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यभान नागणे व संतोष दत्तात्रय कदम सचिव यांची महाशस्त्ररंग मार्शल आर्ट साठी संलग्नता पत्र 2025 या वर्षासाठी धाराशिव अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासाठी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की महाशस्त्ररंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ धाराशिव महाराष्ट्र संघटनेने तुम्हाला लातूरचे प्रतिनिधी म्हणून संलग्नता निवडीचे पत्र दिले आहे. तसेच संलग्नतेची पुढील नूतनीकरण तुमच्या विकास प्रगतीच्या मूल्यांकन आधारित असेल व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत. या निवडीमुळे सर्व स्तरातून नागणे व कदम यांचे अभिनंदन केले जात आहे.


0 Comments