धाराशिव जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला ! कोण जिंकणार रणांगण? आरोप -प्रत्यारोपाच्या फैरीने रणांगण तापले
धाराशिव : जिल्ह्यातील 8 नगराध्यक्ष पदासाठी आणि 188 नगरसेवक पदासाठी नगरपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आता कार्यकर्त्यांसह नेते मंडळ ही दंड थोपटून उतरले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधातील पक्षाने उमेदवार मैदानात उतरवले आहेत. शहरातील गल्लीबोळात प्रचाराची राळ उडाली असून जो -तो आपणच कसे सरस आहोत हे पटवून देण्यासाठी राजकीय पक्षाची भूमिका ,केलेला विकास, आणि भविष्यातील शहर कसे असेल हे पटवून देत आहेत. निवडणूक स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची असली तरी प्रतिष्ठा मात्र मंत्री आणि आमदाराची लागली आहे. प्रचार ऐन मध्यावर असून कमी वेळात अधिक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वकश प्रयत्न केले जात आहेत. 9 वर्षानंतर होत असलेल्या निवडणुका या लक्षवेधी होत आहेत असे असताना मात्र स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि समस्येचा विस्तार हा स्पष्टपणे जाणवत असला तरी सत्ता आपणच काबीज करणारा हा प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक उमेदवाराकडून विश्वास व्यक्त केला जात आहे या सर्व प्रक्रियातून मतदार राजा कोणाला पसंती देणार हे 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

0 Comments