संताप जनक घटना: चॉकलेट देण्याची आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल- परभणी शहरातील घटना
परभणी/प्रतिनिधी रूपेश डोलारे : चॉकलेट देण्याचे आमीष देऊन एका पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याचा परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वसाहतीत घडली हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यामध्ये एका आरोपी विरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत (Posco) विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आली आहे. या संताप जनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश उर्फ बाळू उत्तमराव राठोड वय (39) असे ताब्यात घेतलेले आरोपीचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नवामोंढा पोलीस ठाण्याचे हद्दीत एका वसाहतीमध्ये २ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देण्याची आमीष दाखवुन अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची बाब कुटुंबाला समजले या प्रकरणी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद(FIR) दाखल करण्यात आली आहे. नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजर मखर उपनिरीक्षक भोसले, टर्के, कर्मचारी अनिल कटारे ,अर्जुन टाक, पवार यांच्यासह एलसीबी आणि चाईल्ड लाईन(Childline) पथकाने या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेतली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments