कोर्टाचा निकाल विरोध गेल्याच्या रागातून द्राक्ष बागेवर तन तणनाशक फवारून नुकसान,तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना--
धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे : कोर्टाचा निकाल विरोध गेल्याच्या रागातून द्राक्ष बागेवर तन नाशक फवारून नुस्कान केल्याची घटना भूम तालुक्यातील अंतरगाव शिवारात दी,३ रोजी घडली आहे. याप्रकरणी तीन जनाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील अंतरगाव शिवारातील शेतकरी प्रशांत त्रंबक मोरे यांच्या शेतातील द्राक्ष बागेवर आरोपी रमेश शिवाजी लोद, गणेश शिवाजी लोद, शिवाजी देवराव लोद यांनी कोर्ट प्रकरण निकाल विरोध लागल्याच्या रागातून तन नाशक फवारून नुकसान केले; सदर आरोपीने 405 झाडावर तन नाशक फवारून फिर्यादी यांचे जवळपास 5 ते 7 लाख रुपयाचे नुकसान केले ही घटना दिनांक तीन रोजी घडली या प्रकरणी 3 जनांच्या विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.

0 Comments