धक्कादायक घटना : जन्मदात्यांनीच केला तीन महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा खून, गावात चर्चा होऊन ऑपरेशनचा बनाव आई-वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना-
अहिल्यानगर : मुलगा व वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे तीन महिन्याच्या चिमुकल्याचा आई-वडिलांनीच नदीत फेकून दिला आहे ही घटना घारगाव ता. संगमनेर शिवारात बुधवारी दि, 3 रोजी बुधवारी दिनांक 3 रोजी रात्र साडेसात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आई-वडिलांसह वाहनचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली आहे वरील प्रकाश पंडित जाधव वय (30) आई सविता प्रकाश जाधव वय (32) व वाहन चालक हरिदास गणेश राठोड वय (32) रा. आव्हाणा तालुका भोकरदन (Bhokardan)जिल्हा जालना अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संगमनेर (Sangamner)तालुक्यातील आंबीलखालसा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना गुरुवार दिनांक चार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुळा नदीच्या पत्रात झुडपात दोन-तीन महिन्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चपाती चकली फिरवली पोलीस आणि घटनास्थळी भेट दिली असता तर रस्त्याच्या पलीकडील बाजूच्या उंच घरावर सीसीटीव्ही(CCTV) मिळून आला फुटेज तपासली असता एक पांढऱ्या रंगाची चार चाकी घटनास्थळाकडे येताना दिसली अधिक तपास केला असता सदरची चर्चा की हरिदास गणेश राठोड (रा. आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना )यांची असल्याचे समोर आले पोलिसांनी भोकरदन परिसरातील आषा सेवकांची मदत घेतली त्यांच्याकडून प्रकाश जाधव कविता जाधव यांची नावे समोर आली.
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली अधिक चौकशी केली असता मुलगा शिवांश वय 3 महिने हा आजारी होता. त्याला मणक्याचे आजार होता तो बरा होणार नाही म्हणून समृद्धी मार्गे जाऊन गळा दाबून त्याचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाच्या अंगावरील कपडे काढून घेऊन मृतदेह मुळा (Mula River)नदीत फेकून दिल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना त्यांचा मित्र हरिदास राठोड यांनी मदत केली असून त्याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने केली.
बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन
डॉक्टरांनी मुलाचे आजारावरील उपचारासाठी मोठा खर्च सांगितला होता त्यामुळे आपण मुलाचे जीवन संपवले अशी कबुली आई वडिलांनी दिली आहे विशेष म्हणजे बाळाचा खून केल्यानंतर हे काम करते वाहनाच्या चालकाच्या देव दर्शनाला गेले. प्रकाश पंडित जाधव वय 37 व सविता प्रकाश जाधव वय 32 असे तीन महिन्याच्या मुलाचा खून केलेले आई-वडिलांचे नाव आहेत ते मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील आहेत लग्नानंतर त्यांना पहिला मुलगा झाला तो सतरा वर्षांनी झाला त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी शिवांश उर्फ देवांश असे ठेवले शिवांश सारखा आजारी पडत असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखवण्याची ठरवली.
प्रकाशने त्याचा मित्र हरिदास याला बोलवून घेतली त्याच्याकडे चार चाकी होती मित्राच्या चर्चा तिथून मुलाला घेऊन ती बुधवारी संभाजीनगर ला आले तेथे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली डॉक्टरांनी शिवांश ला मणक्याचे आजार असून उपचारासाठी बराच खर्च लागेल असे सांगितले डॉक्टरच्या भेटीनंतर दोघांना शिवांश नकोसा झाला प्रकाशनी मित्राला समृद्धी मार्गे पुण्याला जायचे आहे असे सांगून चार चाकी काढण्यास सांगितली मित्राच्या चारचकीतून तिघेही समृद्धी मार्गे पुण्याच्या दिशेने निघाली प्रवासादरम्यान प्रकाश हरिदास राठोड यास मुलगा शिवांश ला डॉक्टरांनी मोठा आजार सांगितला आहे. तो फार दिवस जिवंत राहू शकणार नाही त्यावर त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी सायंकाळचे सात वाजले होते त्यांनी सिन्नर जवळ आल्यानंतर वाहन समृद्धीवरून खाली उतरवले तेथे प्रकाशने शिवांश च्या गळा दाबला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुलांच्या अंगावर कपडे काढून घेत मृतदेह पुलाखाली मुळा नदीत फेकून दिला.
मृतदेह विल्हेवाट लावल्यानंतर ते पुढे देवदर्शन साठी आळंदीला गेले तिथून ते पुन्हा त्यांच्या गावी भोकरदनला गेले तोपर्यंत पोलिसांनी या घटनेचा सुगावा लागलेला होता दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर (Ahilyanagar)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंडित दांपत्याच्या घरी पोहचले.
गावात चर्चा होऊ नये म्हणून ऑपरेशनचा बनाव
मुलाच्या हत्येची गावात चर्चा होऊ नये यासाठी त्यांनी शिवांश यांचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले असून ते ऍडमिट आहे असे ते गावात सांगत होते त्यामुळे दवाखान्याचा संशय आला नाही पोलिसांनी तपास करत प्रकाश व सविता अशा दोघांनाही अटक केली पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांचा बनाव उघड झाला आहे.
बायकोला देव दर्शनाला पाठवले
गावात चर्चा होऊ नये यासाठी प्रकाशने सविताला देवदर्शनाला पाठवले घटना घडल्यापासून ती गावात नव्हती पोलिसांनी सुरुवातीला चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाचे वडील प्रकाशाची ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी सविताला ताब्यात घेतले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या घरावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे सीसीटीव्हीतील चार चाकीचा शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला यावरून गुन्ह्याचा शोध लावत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

0 Comments