तुळजापूर तालुक्यातील गंधोरा,चिवरी,हगलुर ,सलगरा परिसरातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची चोरी, लाखोंचे साहित्य लंपास -Naldurg Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा,चिवरी,हगलुर ,सलगरा परिसरातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची चोरी, लाखोंचे साहित्य लंपास -Naldurg Police Station Crime News

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा,चिवरी,हगलुर ,सलगरा परिसरातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या साहित्याची चोरी, लाखोंचे साहित्य लंपास -


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवन ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणांना चोरट्याने टार्गेट करून आज्ञा चोरट्याने लाखो रुपयाची वीज उपकरणे कन्वर्टर पॅनल आणि ट्रान्सफॉर्मली साहित्य चोरून नेल्याच्या चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आले आहेत या सर्व घटनांच्या फिर्यादी एकच व्यक्तीने दिल्यानंतर नळदृग  पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.17.10.2024 रोजी 11.00 वा. पुर्वी गंधोरा पाटी येथील अज्ञात व्यक्तीने कन्व्हर्टर पॅन, ॲक्सेसरीज, सर्व कंट्रोल्स, सेफ्टी चैन, व सप्लाय केबल, रोटर पावर केबल 2 नग कन्व्हर्टर पॅनलचे 04 जी व 05 केबल्स, नेटवर्क केबल, कोअर 15 मिटर स्काउा केबल्स व टावर केबल लीमीट स्वीच 12 मीटर केबल, अर्थाग्‍ स्ट्रीप 400 उमउम, लिमिट स्वीच लिफ्ट सप्लाय केबल व ॲक्सेसरीज एकुण 1,00,000₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावसाहेब भानुदास शेंडे, वय 43 वर्षे, रा. हरोली ता. कवठे, महाकाळ जि. सांगली ह.मु. एस टी कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 तसेच दुसऱ्या घटनेमध्ये दि.09.10.2024 रोजी 11.00 वा गंधोरा पाटी येथील आर एस एल 27 ट्रान्सफार्मर मधील आईल व यु उस उस ट्रान्‌सफार्मर मधील सर्व ॲक्सेसीरीज असा एकुण 95,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीन चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावसाहेब भानुदास शेंडे, वय 43 वर्षे, रा. हरोली ता. कवठे, महाकाळ जि. सांगली ह.मु. एस टी कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तसेच दि.01.06.2024 रोजी 23.00 ते दि.02.06.2025 रोजी 05.00 वा. सु. सलगरा ते शिमदरा तांडा 2.5 कि. मी. येथील आर एस एल 68 ते 33 के. व्ही सबस्टेशन दरम्यानच्या सुमारे 2.5 कि.मी. लांबीच्या विज वाहिन्या एकुण 90,000₹ किंमतीच्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावसाहेब भानुदास शेंडे, वय 43 वर्षे, रा. हरोली ता. कवठे, महाकाळ जि. सांगली ह.मु. एस टी कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तसेच दि.24.02.2025 रोजी 20.30 ते दि.25.02.2025 रोजी 11.00 वा. सु. चिवरी ते आरळी तसेच हगलुर ते मानेवाडी या गावाच्या हद्दीमधून रिन्यु ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीमार्फत उभे करण्यात आलेल्या  आर.उस.उल. 24 ते 22 जोडण्यासाठी पॅन्थर लाईन विज वाहीनीचे 8 पोलची पॅन्थर लाईन कंडक्टर्स(वायर्स) 840 मिटर एकुण 80,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावसाहेब भानुदास शेंडे, वय 43 वर्षे, रा. हरोली ता. कवठे, महाकाळ जि. सांगली ह.मु. एस टी कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम(Bhartiya Nyay Sanhita)  303(2) अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

Post a Comment

0 Comments