तृतीयपंथी आत्महत्या प्रकरणी प्रियकर ३ दिवसाची पोलीस कोठडी, प्रियकर दुसऱ्या तरुणीशी लग्न करत असल्याचा धक्का न सहन झाल्याने केली होती आत्महत्या-
सोलापूर : आठ वर्षापासून प्रेम संबंध असलेल्या प्रियकरांनी अचानक नात तोडून दुसरे लग्न करत असल्याचा धक्का सहन झाल्याने प्रेयसी असलेल्या तृतीयपंथिनी आत्महत्या केली . या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकर सुजित जमादार या सोलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस.बी नवले यांनी त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तृतीयपंथी प्रकाश कोळी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्या भावांनी दिलेल्या फिर्यादीवरून(FIR) त्याचा प्रियकर सुजित आप्पासाहेब जमादार यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
हळदीच्या दिवशीच पोलिसांनी त्यास अटक केली शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक खंडागळे हे करत आहेत.

0 Comments