बीड : लॉजवर नेऊन विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार, एका विरुद्ध गुन्हा दाखल-
बीड : आयुष्यभर तुझा सांभाळ करतो असे म्हणून एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील एका गावातील 35 वर्षीय पिडीता विधवा तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन संशयीत अनिल दातार (रा. शिरापूर तालुका आष्टी) यांनी तिला मी तुझा आयुष्यभर सांभाळ करतो असे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढला. कडा येथील एका लॉज मध्ये नेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केला वर्षभर हा प्रकार सुरू होता त्यानंतर दातार यांनी पिडीतेचे फोन घेणे बंद केले तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह अट्रासिटी कायद्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

0 Comments