पार्टीला का येत नाही या कारणावरून एकास बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
उमरगा : बटईने केलेल्या शेतात पार्टीला का येत नाही या कारणावरून एकास शिवीगाळ करून बेदम मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथे घडले आहे याप्रकरणी एका आरोपी विरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी-मोहमदियॉ झाकीर बागवान, रा.अशोक चौक मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.29.11.2025 रोजी 12.30 वा. सु. सुंदरवाडी शिवारातील शाहीन झाकीर हुसेन बागवान बटईने केलेल्या शेतात शेत गट नं 39(1)(2) शेतात फिर्यादी नामे-युसुफ मकबुल ढोबळे, वय 45 वर्षे, रा.जैनमंदीराच्या पाठीमागे मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बटईने केलेल्या शेतात पार्टीला का येत नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, लोखंडी कटाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याच धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-युसुफ ढोबळे यांनी दि.02.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे मुरुम येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास करून पोलीस करत आहेत.

0 Comments