मौजे धनगरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार दि.५ डिसेंबर रोजी प्रारंभ-
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
हभप. आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवार दि.११डिसेंबर रोजी होणार सांगता.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सप्ताह सोहळ्यातील प्रवचन कीर्तन सेवेचा लाभ गाव परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा ग्रामस्थांचे आवाहन.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे धनगरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार दि.५ डिसेंबर २०२५ रोजी प्रारंभ होत असून गुरुवार दि.११ डिसेंबर २०२५ रोजी सांगता होणार आहे तरी या सात दिवसातील धार्मिक कार्यक्रमाचा गाव परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे. मौजे धनगरवाडी व पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांना कळविण्यात अत्यानंद होत आहे की, श्री. पांडुरंगाच्या कृपेने श्री संत सद्गुरू शिवराम बुवा दिंडेगावकर व वै. श्री संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय हनुमान भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ धनगरवाडी यांच्या तन मन धन व सेवा सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असून या पारायण सोहळ्यातील श्री जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र, प्रवचन, कीर्तन व भजनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आलेले आहे. श्री. जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा प्रवक्ते व अधिष्ठान व्यासपीठ चालक म्हणून हभप दीपक महाराज निकम हे असुन या पारायण सोहळ्यात प्रवचनकार म्हणून हभप. विष्णुपंत मुंढे महाराज, हभप. शिवाजी महाराज चव्हाण, हभप. मल्लिनाथ बिराजदार सर, हभप. दगडु जोडभावे सर, हभप. दिनेश महाराज सलगरे व हभप रघुनाथ महाराज हजारे सेवा देणार आहेत तर किर्तनरुपी सेवेसाठी हभप. ज्ञानेश्वर महाराज माकणीकर, हभप. भूषण महाराज तळनिकर , हभप. कृष्णा चवरे, हभप चैतन्य महाराज वासकर, हभप यशवंत महाराज पाटील व हभप. श्रीनाथ महाराज शिरवळकर हे आहेत. हभप. आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन व काला वाटप होवून या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांची भोजनाची व प्रसादाची व्यवस्था ही मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.तरी गाव परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्यातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

0 Comments