प्रेस पत्रकार व संपादक सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष सोमनाथ पांडूरंग खंडागळे यांना शंभू सेना यांच्या वतीने "राज्यस्तरीय छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रेस पत्रकार व संपादक सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष सोमनाथ पांडूरंग खंडागळे यांना शंभू सेना यांच्या वतीने "राज्यस्तरीय छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित






अकलूज : प्रेस पत्रकार व संपादक सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष सोमनाथ पांडूरंग खंडागळे यांना शंभू सेना यांच्या वतीने "राज्यस्तरीय छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव पुरस्कारा सन्मान  २०२५" हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

माढा येथील जगदाळे फॅमिली हॉलमध्ये सोमनाथ खंडागळे यांना शंभू सेनेचे संस्थापक सेनाप्रमूख अतुलनाना माने पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वितरण सोहळ्यास सरचिटणीस समीरभाई शेख, राज्य उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर बदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सोमनाथ खंडागळे यांनी पत्रकार संघ व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण, सार्वजनिक वाचनालय, खाऊ वाटप, गरजवंतांना मदत आदी समाजोपयोगी कार्य केले असून पत्रकारिता व समाजकार्य या मध्ये गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण निःस्वार्थी कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments