दुर्दैवी घटना : हार्वेस्टरमध्ये ऊस टाकताना शेतकऱ्याचा तोल जाऊन मशीनमध्ये अडकुन शेतकऱ्याचा मृत्यू; शेतकऱ्यांच्या शरीराचे पडले कांडके, अंगावर काटा आणणारी लातूर जिल्ह्यातील घटना-
लातूर : ऊस तोडणी दरम्यान खाली पडलेला ऊस हार्वेस्टरमध्ये टाकताना शेतकऱ्याचा तोल जाऊन मशीनमध्ये अडकून दुर्दैवी अंत झाला यामध्ये शेतकऱ्याचे शरीराचे तुकडे तुकडे झाल्याची अंगावर काटा आणणारी घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव येथे बुधवारी दिनांक 24 रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेत शंकर प्रभाकर सावंत वय 40 राहणार आशिव ता. औसा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी भादा पोलिस ठाण्यात गुरुवारी दि,२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव येथील शंकर सावंत यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी कारखान्याचा हार्वेस्टर दाखल झाला होता बुधवारी दुपारी अडीच वाजता हार्वेस्टरद्वारे ऊस तोडून सुरू असताना काही ऊस बाजूला पडला होता.हा ऊस पुन्हा हार्वेस्टर मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते यात शंकर सावंत अचानक मशीन मध्ये अडकले क्षणातच हार्वेस्टरच्या शक्तिशाली यंत्रणेमुळे त्यांच्या शरीराचे तुकडे झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारनंतर सावंत शेता दिसत नसल्याने त्यांच्या पत्नी व मुलाने शोध सुरू केला दीड दोन तासाच्या शोधा नंतर उसाच्या काकरीमध्ये त्यांचा मोबाईल व चप्पल आढळून आले आणि संशय बळावला. हार्वेस्टर चालकाला विचारणा केली असता त्याने सुरुवातीला मशीनमध्ये बिघाड आहे असे सांगत माहिती देण्याचे टाळले.
हार्वेस्टर चालकाला शेतकरी मशीन मध्ये अडकून मृत्यूमुखी पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मशीन बंद करून मालकाला माहिती दिली मालकाने भादा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांची तीन पथके सायंकाळी सातच्या सुमारास शेतात दाखल झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मशीन मधून बाहेर काढून पंचनामा केला या दुर्दैवी घटनेमुळे औसा तालुक्यासह परिसरात परिसरात शोककळा पसरली आहे .
सावंत यांच्या पश्चात काही पत्नी दोन मुली व दोन मुली असा परिवार आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव हे करत आहेत . हार्वेस्टरसारख्या यंत्रांबाबत कडक सुरक्षा नियम लागू करावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, शेतात यांत्रिक साधनांचा वापर वाढत असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

0 Comments