तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथे घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तुळजापूर: तालुक्यातील मेसाई जवळगा घरफोडी करून चोरट्यांनी अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक 11 रोजी घडली याप्रकरणी येथील रघुनाथ वसंत वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानके महामार्ग याचबरोबर आता ग्रामीण भागातही चोरट्याने मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेले अधिक माहिती अशी की ,फिर्यादी नामे- रघुनाथ वसंत वाघ, वय 45 वर्षे, रा.मेसाई जवळगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.11.12.2025 रोजी 00.00 ते 06.00 वा. सु. तोडून आत प्रेवश करुन कपाटातील व डब्यातील 48 ग्रॅम वजनाचे सोन्याचे (Gold Weight)दागिने व रोख रक्कम 6,000₹ असा एकुण 2,46,000 किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रघुनाथ वाघ यांनी दि.11.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.(Bhartiy Nyay Sanhita) कलम 331(4),305 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments