वनभोजनाचा आनंद लुटा; पण घराची सुरक्षा ही जपा- वेळ अमावस्या सणानिमित्त नळदुर्ग पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनNaldurg Police Station Public Notification

Hot Posts

6/recent/ticker-posts

वनभोजनाचा आनंद लुटा; पण घराची सुरक्षा ही जपा- वेळ अमावस्या सणानिमित्त नळदुर्ग पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनNaldurg Police Station Public Notification

वनभोजनाचा आनंद लुटा; पण घराची सुरक्षा ही जपा- वेळ अमावस्या सणानिमित्त नळदुर्ग पोलीस प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन



तुळजापूर : ग्रामीण संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणजे वेळ अमावस्या सण या दिवशी नागरिक सहकुटुंब वनभोजनासाठी शेतात जातात अशातच संधीचा फायदा घेत चोरटे चोरी करण्याच्या प्रयत्नात असतात तरी आपण सूचनेप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन चंद्रकांत यादव यांनी केले आहे.

आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सर्वत्र वेळा अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.ग्रामीण संस्कृतीतील या महत्त्वाच्या सणा निमित्त नागरिक सहकुटुंब भोजनासाठी शेतात जातात मात्र याच काळात गावे ओस पडत असल्याचा फायदा चोरटे घेऊ शकतात ही शक्यता ओळखून नळदुर्ग पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे .पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी घरातील सोने चांदीची दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी घरात मोठ्या रकमा किंवा मौल्यवान दागिने  ठेवून नयेत.तसेच गल्लीत किंवा परिसरातील संशयित इसम आढळल्यास तात्काळ सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील बीट अंमलदार किंवा डायल 112 वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments