तुळजापूर येथे भाविकांचे पर्स मधील सोन्याची दागिने व रोकड पळवणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या , दोन महिला पोलिसांच्या ताब्यात-Tuljapur Robbery News Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर येथे भाविकांचे पर्स मधील सोन्याची दागिने व रोकड पळवणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या , दोन महिला पोलिसांच्या ताब्यात-Tuljapur Robbery News Crime

तुळजापूर येथे  भाविकांचे पर्स मधील सोन्याची दागिने व रोकड पळवणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या , दोन महिला पोलिसांच्या ताब्यात-


धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापूर येथे देवी दर्शन साठी आलेल्या मुंबई येथील महिला भाविकांच्या पर्स मधील रोकड व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची कसून चौकशी केली आहे या प्रकरणी मुंबई येथील महिला भाविकांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद दोन महिलेविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकांचे पर्स मधील सोन्याची दागिने व रोकड लंपास केल्याची घटना मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी घडली होती या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत अवघ्या काही वेळात दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र जप्त केलेला मुद्दे मला संबंधित महिला भाविकांना मिळण्यास सहा ते सात तासाचा विलंब झाल्याने महिला भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,फिर्यादी नामे-संजोता बाळासाहेब बेडक्याळे, वय 40 वर्षे, रा. अजिंक्यतारा सोसायटी बी 3(5) चेंबुर मुंबई यादि.16.12.2025 रोजी 12.15 वा. सु. त्यांच्या मैत्रीणीसोबत देव दर्शनासाठी तुळजाभवानी मंदीरात जात असताना महाद्वारात प्रवेश करत असताना  संशईत आरोपी नामे- स्नेहा हिरेमन सुकळे, वय 25 वर्षे, निलाबाई शिवराम शिंदे, वय 55 वर्षे, दोघी रा. राशन ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांनी संजोता बेडक्याळे यांचे पर्स मधील 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,230₹ असा एकुण 1,10,230₹ किमंतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजोता बेडक्याळे यांनी दि.16.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीवरुन  पोलीसांनी आरोपी नामे- स्नेहा हिरेमन सुकळे, वय 25 वर्षे, निलाबाई शिवराम शिंदे, वय 55 वर्षे, दोघी रा. राशन ता. कर्जत जि. अहिल्यानगर  यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सुरु आहे.

महिला भाविकांना मुद्देमाल  मिळण्यास सहा ते तासाचा विलंब

या चोरी प्रकरणातील दोन महिला आरोपीकडून जप्त केलेला मुद्देमाल महिलाभाविकेला प्रत्यक्ष मिळण्यास मोठा विलंब लागला सहा ते सात तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आल्याने संबंधित महिला भाविकांसह  इतर महिलांनीही पोलीस स्टेशनमध्ये संताप व्यक्त केला आहे तर तत्पर कारवाई करून चोरीचा तपास पूर्ण झाला असतानाही मुद्देमाल देण्यात झालेल्या विलंबा बाबत पोलीस प्रशासनाने अधिक संवेदनशीलता दाखवावी अशी भावना यावेळी महिला भाविकांनी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments