तुळजापूर : विरोधात प्रचार का केलास या कारणावरून एकास मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Crime

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : विरोधात प्रचार का केलास या कारणावरून एकास मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल-Tuljapur Crime

तुळजापूर : विरोधात प्रचार का केलास या कारणावरून एकास मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल-


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरमध्ये दोन गटात जोरदार भांडण आणि हाणामारी झाल्याची घटना घडली. तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे निवडणूक लढवलेले उमेदवार पिटु गंगने व महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झाला होता. अखेर तुळजापूर येथील गोळीबार व कोयत्याने हाणामारी प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आठ आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुलदीप मगर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात गोळीबार तसेच जीवे मारण्याच्या प्रयत्न सह अन्य कलमाने गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,आरोपी  नामे- सुरज नन्नु साठे, चेतन शिंदे, सागर किशोर गंगणे, शुभम साठे, शेखर किरण गंगणे, नंदु गंगणे, बालाजी गंगणे, अतुल दळवी व इतर 9 इसम सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.12.2025 रोजी 17.00 ते 18.00 वा. सु.विठाई हॉस्पीटल समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-कुलदिप दिलीप मगर, वय 40 वर्षे, रा. एस.टी. कॉलनी तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु विनोद पिंटु गंगणे च्या विरोधात का प्रचार केला या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, अग्निशस्त्र, कोयते, धारदार शस्त्र व कत्तीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कुलदिप मगर यांनी दि.17.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190 सह 3/25, 4/25, आर्म ॲक्ट सह कलम 37 (1)(3) मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments