लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार: तरुणावर गुन्हा दाखल- तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून एका बावीस वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील नळदृग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे . ही घटना दिनांक 18 रोजी दीड वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील नळदृग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 22 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) मार्च 2025 ते दि.18.01.2026 रोजी 01.30 वा. सु. रोजी हिस एका गावातील एका तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिस शेतात घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. झाल्या प्रकारा बाबत तुझे घरच्यांना सागिंतले तर त्यांना व तुला जिवे ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.21.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-69 सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(2)(व्ही), 3(1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

0 Comments