सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील -Suicide News Bhum Taluka

Hot Posts

6/recent/ticker-posts

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील -Suicide News Bhum Taluka

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील -Suicide News Bhum Taluka

धाराशिव:  सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहीतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील बेदरवाडी येथे घडली आहे; ही घटना दिनांक 19 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या पती सासू ,सासरे, नणंद यांच्याविरुद्ध भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत नामे-पायल शुभम वनवे, रा.बेदरवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.01.2026 रोजी 01.30 वा.सु.बेदरवाडी येथे राहत्या घरी विषारी औषध पिवून आत्महत्या केली. आरोपी नामे-पती शुभम सुरेश वनवे, सासरे सुरेश दादासाहेब वनवे, सासु शारदा सुरेश वनवे, तिघे रा. बेदरवाडी ता. भुम जि. धाराशिव, नणंद- सुष्मा  खाडे रा. कुरकुंब ता. पंढरपुर जि. सोलापूर  यांनी मयत पायल हीस  ऑक्टोबर 2025 ते दि. 19.01.2026  रोजी 01.30 वा. सु. शुभम वनवे यांने उसाने मारहाण करुन वारंवार शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत पायल यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पुजा शेषेराव जाधवर, वय 32 वर्षे, रा. बेदरवाडी ता.भुम जि. धाराशिव यांनी दि.19.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-107, 351(3)भान्यासं सह कलम 4 पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments