चिवरी पंचायत समिती गणातून माजी सैनिक संभाजी काळजाते यांचा शिंदे गटाकडुन उमेदवारी अर्ज दाखल-
चिवरी /प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : अणदुर जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या चिवरी पंचायत समिती गणातून शिंदे गटाकडून चिवरी येथील माजी सैनिक तथा सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुकाध्यक्ष संभाजी बळीराम काळजाते यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता; या निवडणुकीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अंदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गण हा मोठा गण मानला जातो, तर हा गण खुला पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे या गणात आगामी काळात कोणकोणत्या उमेदवारात लढत रंगणार ? व आगामी काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडणार याकडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे.
माजी सैनिक संभाजी काळजाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, मी सैन्य दलामध्ये १७ वर्ष देश सेवेसाठी घालवले आहेत उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये येऊन प्रामाणिकपणे काम करून शेतकरी, शेतमजूर, नवोदित युवकांना सैन्य भरती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन करणे, तरुणांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहन करणे, माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी सदैव तत्परतेन काम करणार, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, मी राजकारणामध्ये पैसा कमवण्यासाठी येणार नसून जनतेचे प्रामाणिकपणे प्रश्न सोडवणार , महायुतीकडून पक्षाने निवडणूक लढवण्यास संधी दिल्यास संधीचे सोनं करणार असे प्रतिनिधी बोलताना श्री काळजाते यांनी सांगितले.

0 Comments