रॉकेल ओतून महिलेचा पेटवून देऊन खून आरोपीस जन्मठेप 25 हजाराचा दंड धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv Court Judgement #खून

Hot Posts

6/recent/ticker-posts

रॉकेल ओतून महिलेचा पेटवून देऊन खून आरोपीस जन्मठेप 25 हजाराचा दंड धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv Court Judgement #खून

रॉकेल ओतून महिलेचा पेटवून देऊन खून आरोपीस जन्मठेप 25 हजाराचा दंड धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Dharashiv Court Judgement #खून 


धाराशिव:  महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारल्यानंतर करणे आरोपीस जन्मठेप व 25 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री डी देव यांनी सुनावली आहे. ही माहिती शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिली

याबाबत सरकारी अभियोक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील दशरथ मुरलीधर सरोदे वय 35 हा फिर्यादी नेता शशिकांत विधाते वय 35 राहणार समजावे से गल्ली धाराशिव यांच्या घरी भाड्याच्या घरात राहत होता. फिर्यादी यांचे पती 15 ते 16 वर्षापासून सोबत राहत नव्हते फिर्यादी व आरोपी दशरथ सरवदे यांची ओळख झाल्यानंतर तो फिर्यादी सोबत दोन-तीन महिने व्यवस्थित राहिला त्यानंतर आरोपी फिर्यादीस त्रास देऊ लागला 26 मार्च 2017 रोजी फिर्यादीचा मुलगा सुजित आरोपी आरोपीची आई मावशी व आजी हे जेवण करून रात्री घराच्या गच्चीवर झोपण्यास गेले होते; दरम्यान आरोपीने फिर्यादी सोबत भांडण केले व त्यानंतर आरोपी व फिर्यादी खाली घरामध्ये आली.

तेथेही आरोपीने फिर्यादी सोबत भांडण सुरू केले यावेळी आरोपी  फिर्यादीच्या अंगावर रॉकेल ओतून काडीने पेटवून दिले त्यानंतर फिर्यादीचा वाचवा वाचवा असा आवाज ऐकून फिर्यादीचा मुलगा सुजित त्या ठिकाणी आला .त्यांनी त्याच्या आईस अंगावर बकेटने पाणी ओतून वीजवत असताना आरोपीची आजी ,मावशी व आई यांनी सुजित यास आईस विझवू नको तिला मरू दे असे म्हणत गुन्हास प्रमुख आरोपीस मदत केली तसेच जखमी फिर्यादीस दवाखान्यात घेऊन न जाता सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले .त्यानंतर फिर्यादीचा मुलगा सुजित यांनी जखमी आईस रिक्षा बसून जिल्हा शासकीय रुग्णालयात धाराशिव येथे उपचारासाठी दाखल केले.

ती शुद्धीवर असताना तिचा मृत्यूपूर्व जबाब वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष पोलीस समक्षक घेण्यात आला. त्या अनुषंगाने दशरथ सरवदे  त्यांची आई शहाबाई मुरलीधर सरवदे,  मावशी प्रमिला शोभा अनिल घाडगे व आजी कस्तुराबाई बाबुराव गायकवाड यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला . पोलीस उपनिरीक्षक संग्राम जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून सर्व आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपञ  दाखल केले . जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री. डी. देव यांच्यासमोर या प्रकरणाचे सुनावणी झाली सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आली. तपासा दरम्यान फिर्यादी तथा जखमी निता विधाते यांचा उपचारादरम्यान घेतलेल्या जवाबदाची तपास अधिकारी जाधव यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. हे रेकॉर्डिंग सदर प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरले नायब तहसीलदार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्या समक्ष दुसरा मृत्यू पूर्व जबाब नोंदवला होता .या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार माहित असा मुलगा सुजित विधाते मयताची तोंड लेखी मृत्यू व जवाब तोंडी व्हिडिओग्राफी मृत्यूपूर्व जॉब हे एकमेकांशी सुसंगत असल्याची सुनावणी स्पष्ट झाली .साक्ष पुराव्यानंतर न्यायालयाने आरोग्य दशरथ यास जन्मठेप व 25 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोकवण्यात आली इतर तीन महिला आरोपी यांची सबळ पुरावे अभावी निर्दष  मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता श्री सचिन सूर्यवंशी यांनी भक्कम बाजू मांडली. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक पी.एस तेलप साठे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments