तुळजापूर येथे 24 ते 25 फेब्रुवारी रोजी श्री तुळजाभवानी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन, या महोत्सवामध्ये शेतकरी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन-
धाराशिव : तुळजापूर येथे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी शेतकरी वरिष्ठ व कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा विभाग कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 चे दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सैनिक विद्यालय मैदान नळदुर्ग रोड तुळजापूर येथे आयोजन करण्यात आले आहे .कृषी महोत्सवाची उद्घाटन माननीय श्री प्रतापजी इंद्राबाई बाबुराव सरनाईक राज्य परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यांच्या हस्ते होणार असून सर्व लोकप्रतिनिधीची यावेळी उपस्थित राहणार आहे.
या कृषी महोत्सवामध्ये एकूण 60 दालन असून त्यापैकी 35 दालने शासकीय योजना प्रकल्पासाठी असून उर्वरित खाजगी संस्था करत आहे. कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन परिसंवाद चर्चासत्र उत्पादक ते थेट ग्राहक विक्री दालन शेतकरी सन्मान प्रारंभ होणार आहे ;तसेच कृषी विद्यापीठाची दालने विविध संशोधन केंद्र ,कृषी विज्ञान केंद्र प्रक्रिया उद्योगांची विशेष सादरीकरण परिसंवाद या निमित्ताने होणार आहे कृषी महोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण उस्मानाबादी शेळी राहणार आहेत .या महोत्सवात कृषी संलग्न विभागाचा ही सक्रिय सहभाग असणार आहेत याकरिता कृषी विद्यापीठे महसूल विभाग जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ,सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन दुग्धविकास मस्त व्यवसाय रेशीम उद्योग जलसंधारण विभाग वन विभाग महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ महाबीज भूजल सर्वेक्षण सहकार महिला बाल व कल्याण विकास महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदिवासी विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना आरोग्य विभाग समाज कल्याण विभाग इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना प्रदर्शनाचा आणि चर्चासत्राचा लाभ घेता येणार आहे.
कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयाने विविध पिके जसे की सोयाबीन ,हरभरा, फळबाग लागवड आदी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानापासून ते विपणापर्यंत तसेच निर्यातक्षम केळी लागवड तंत्रज्ञान रेशीम लागवडी व्यवस्थापन निरीक्षण द्राक्ष उत्पादन व कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे ऊस शेती उत्पादन व व्यवस्थापन आंबा लागवड तंत्रज्ञान व मोहर व्यवस्थापन इत्यादी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन आणि अभियान माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक मिशन माहिती विभाग शेतकरी मासिक पीएमई कृषी यांत्रिकीकरण कंट्रोल तंत्रज्ञान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू आदिनाथ स्वतंत्र जालना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विविध विषयावरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तज्ञ येणार आहेत.
तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्चतंत्र व नवनवीन तंत्रज्ञान संधी व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी कृषी महोत्सवात अवश्य भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार मोरे यांनी केले आहे.

0 Comments