भुम- साडेतीन लाखाच्या खंडणीसाठी तरुणास बेदम मारहाण; अपहरणाची धमकी- चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव : 20 टक्के व्याज दराने घेतलेल्या 30000 रुपयांच्या बदल्यात 60 हजार रुपये देऊनही आणखी पैशाचा तगादा लावत 3 लाख 50 हजार रुपये घेऊन ये असं म्हणत एका तरुणास मारहाण करण्यात आली तसेच पैसे नाही दिले तर तुझे अपहरण करू असे म्हणत एका खंडणी मागणाऱ्या चौघा जनाविरुद्ध भूम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान भूम शहरात घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-दशरथ उर्फ दादा काळे, बापु आप्पा काळे, छायाबाई दशरथ उर्फ दादा काळे, सरस्वती बापु काळे सर्व रा. कल्याण नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.30.01.2026 रोजी ते दि.10.02.2026 रोजी 09.30 वा. सु. फिर्यादी नामे- विनित सुनिल शेटे, वय 20 वर्षे, रा. कसबा भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन नमुद आरोपी यांचेकडुन फिर्यादीने 30,000₹ एक आठवड्याला 20 टक्के व्याजदराने घेतले होते. त्या पैशावर जास्त व्याज लावुन फिर्यादीकडून एका महिन्याचे 60,000₹ घेवुन सुध्दा नमुद आरोपींनी फिर्यादीस जबरदस्तीने सोडतीन लाख रुपयांची मागणी करुन जर पैसे दिले नाही तर उचलुन घेवून जाण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विनित सुनिल शेटे यांनी दि.10.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे भुम येथे भा.न्या.सं.कलम 308(2), 352, 3(5) सह कलम महा सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39,44,45 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास भुम पोलीस करत आहेत.

0 Comments