पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीसह एक जणांवर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-ंMurum Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीसह एक जणांवर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-ंMurum Police Station Crime News

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीसह एक जणांवर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव: पर पुरुषासोबत पत्नीचे असलेले अनैतिक संबंधाला कंटाळून एका ३५ वर्षीय तरुण पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील शास्त्रीनगर तांडा येथे घडली ही घटना दिनांक दहा रोजी घडली आहे याप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासह पत्नीवर मुरूम पोलीस ठाण्यात आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,मयत नामे-काळु उर्फ सुरज देविदास राठोड, वय 35 वर्षे, रा.शास्त्री नगर तांडा दाळींब, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.10.02.2026 रोजी 21.00 ते 21.30 वा.सु. दाळींब शिवारात मयताचे  स्वत:चे शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-युवराज दत्तु भोळे,  आशा काळु उर्फ सुरज राठोड, दोघे रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांचे अनैतिक संबंध समजावुन सांगुनही बंद होत नसल्याचे कारणावरुन व मयत यांना शिवीगाळ करुन धमकी देवून त्रास देत असल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत काळु उर्फ सुरज यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनोहर देवराव उर्फ देविदास राठोड, वय 42 वर्षे, रा. शास्त्री नगर तांडा दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.11.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 352, 351(2) (3), 3(5)भान्यासं अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास मुरूम पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments