मौजे उमरगा चि. येथे ‘मैत्री मनाशी’ जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
---------------------------------------
मानसिक आरोग्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकतेची नवी लाट.
----------------------------------------
इटकळ (प्रतिनिधी) : तुळजापूर तालुक्यातील मौजे उमरगा चि. येथे मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या ‘मैत्री मनाशी’ अभियानाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिरासमोर हा उपक्रम उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच Project HOPE Hello Medical Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे,
मानसिक आरोग्याचे वाढते महत्त्व व सामाजिक जबाबदारी,
तणाव व्यवस्थापनाचे प्रभावी उपाय,
नैराश्याची लक्षणे ओळखण्याबाबत मार्गदर्शन,मानसिक आजार व उपलब्ध उपचार पद्धतींची माहिती शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग व शंकानिरसन सत्र कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. मानसिक आरोग्याबाबत भीती व गैरसमज दूर करण्याचा प्रभावी प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सर्वेश्वर पाटील होते. यावेळी मनमित्र प्रभाकर जाधव, सचीन तांबे, मनमित्र प्रियांका सावंत, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी सावंत, लक्ष्मी चाफे, उपसरपंच मोहम्मद पिंजारी, जनसेवक गोरख बोराडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्तरावर मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करून ‘मैत्री मनाशी’ अभियानाने समाजमनाला स्पर्श केला असून, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments