कळंब: कन्हेरवाडी शिवारात अफुच्या शेतीचा पर्दाफाश पोलिसांकडून 15 लाखाचा मुद्देमाल जप्त शेतकऱ्यावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील दुसरी कारवाई-
धाराशिव : कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात अवैधरित्या अफुच्या झाडाची लागवड केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा रस्त्यालगत शेत गट क्रमांक 316 मधील विलास नवनाथ कवडे यांच्या शेतात तब्बल 100 किलो वजनाची अफूची झाडे आढळून आली आहेत या झाडांची अंदाजे किंमत प्रतिक्रू 15000 रुपये दराने 15 लाख रुपये असून याप्रकरणी कळंब पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दशमे गाव पाठोपाठ याच परिसरात कन्हेरवाडी येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,:दि.13.02.2026 रोजी पोलीस निरीक्षक- श्री. चिंतले पोलीस ठाणे कळंब यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कन्हेरवाडी शिवारातील शेत गट नं 316 येथील इसम नामे- विलास नवनाथ कवडे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यानी त्याचे शेतात अंमली पदार्थाची लागवड केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन बातमीच्या ठिकाणी हजर रहा असे सांगीतले वरुन स्टाफ सह सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास अफुच्या झाडाची लागवडी बाबत चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने सदर शेतातील दहा पांढरे रंगाचे प्लास्टिकचे पोते ज्यामध्ये अफुची हिरवी ओले ताजे पाने असलेले, बोंडासहित व मुळासहित एकुण 15,00,000₹ किंमतीचा गांजा माल मिळून आल्याने सदर माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गांजा सदृश्य अंमली पदार्थ लागवड करणारे विलास कवडे यांचेविरुध्द एन. डी. पी. एस कायदा 8(क),18 अन्वये गुरंन 60/2026 असा गुन्हा कळंब पो.ठा. येथे 13.02.2026 रोजी नोंदवला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी- श्री. चिंतले, सपोनि श्री. मगर, पोउपनि- श्री. घाडगे, पोलीस हावलदार- जाधवर, पोलीस नाईक- शिंदे, पोलीस अंमलदार-मुंढे, करवर, गजाबार यांच्या पथकाने केली.
0 Comments