मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
--------------------------------------------
कवयित्री साहित्यिका तथा शिक्षिका श्रीमती कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
-------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) : मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कवयित्री, साहित्यिका व शिक्षिका कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी कविता पुदाले यांनी कुसुमाग्रजांची प्रतिमा शाळेस भेट म्हणून प्रदान केली.यानंतर विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत गावातून ग्रंथदिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या जयघोषात आणि वारकरी पावलांच्या तालावर विद्यार्थी तल्लीन झाले होते. या उपक्रमातून “पुस्तकांचे जीवनातील महत्त्व” अधोरेखित करण्याचा संदेश देण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले तसेच त्यांच्या गीतांवर नृत्य सादर केले. बालसभेचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. विविध कलागुणांचे सादरीकरण करून कार्यक्रम अधिक रंगतदार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून त्यांच्या रसाळ वाणीमधून संत साहित्याचा सुगंध विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लाभत असतो. त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेत अक्षरवेल महिला साहित्य मंडळ संस्थापक अध्यक्ष कविता पुदाले यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि ‘संत साहित्याचा दरवळ’ सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक तानाजी जाधव, सतिश ढोणे, सुनिता माने, सविता पवार, जया भोसले, सरिका इंगळे आणि भाग्यश्री पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पुदाले यांनी केले, अध्यक्षीय समारोप तानाजी गायकवाड यांनी केला तर आभारप्रदर्शन सतिश ढोणे यांनी केले.एकूणच, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान आणि साहित्याविषयी प्रेम अधिक दृढ झाले.


0 Comments