तुळजापूर : बारुळ पाटीजवळ भीषण अपघात; तरुणीचा मृत्यू, चौघे जखमी - कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव /प्रतिनिधी : तुळजापूर-नळदुर्ग मार्गावर भरधाव कार पलटी होऊन झालेल्या अपघातात 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघाताची घटना
दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास वेताळनगर, तुळजापूर येथील जय गणपत गायकवाड (वय 21 वर्षे) हे एमएच 12 एचएल 1763 क्रमांकाची कार चालवत होते. त्यांच्यासोबत आशा गणपत गायकवाड, अंजली अनिल गायकवाड, प्राप्ती उमेश राउत व प्रतीक्षा गणेश गायकवाड (वय 26 वर्षे) हे प्रवास करत होते.
बारुळ पाटीच्या पुढे सुमारे 600 ते 700 फूट अंतरावर, नळदुर्ग ते तुळजापूर रोडवर कार भरधाव व निष्काळजीपणे चालवल्याने वाहनावरील ताबा सुटून कार पलटी झाल्याची माहिती आहे.
मृत्यू व जखमी
या भीषण अपघातात प्रतीक्षा गणेश गायकवाड या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडल्या. तर कार चालक जय गायकवाड तसेच आशा गायकवाड, अंजली गायकवाड व प्राप्ती राउत या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी फिर्यादी गणेश सुरेश गायकवाड (वय 36 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर) यांनी दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments